ही आहे एमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय निर्माती

 ही आहे एमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय निर्माती

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेलिव्हिजन प्रोडक्शन बालाजी टेलिफिल्म्सची सह-संस्थापक आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती एकता कपूरला भारतीय टेलिव्हिजनमधील तिच्या कारकिर्दीसाठी आणि कामासाठी ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. भारताची कंटेंट क्वीन म्हणून परिचित असलेल्या एकता कपूरला २०२३ चा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळणार असल्याची घोषणा ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स’चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पासनर नुकतीच केली. हा पुरस्कार एकता कपूरला २० नोव्हेंबर २०२३ रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स गालामध्ये देण्यात येणार आहे.

बॉलीवूडचे दिग्गज कलाकार जितेंद्र यांची लेक असलेल्या एकता कपूरने केवळ टिव्ही विश्वच नाही तर चित्रपटांमध्येही एकता कपूरने निर्माता आणि दिग्दर्शक म्हणुन वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर एकताने पोस्ट शेयर करत लिहिले की, “हा सन्मान मिळाल्याने मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. जागतिक व्यासपीठावर मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” एमी अवॉर्ड व्यतिरिक्त एकता कपूरचा फॉर्च्यून इंडियासाठी आशियातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

एकताच्या कारकिर्दीबाबत बोलताना ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स’चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पासनर म्हणाले, ‘एकता कपूरने बालाजीला टेलिव्हिजन कटेंट इंडस्ट्रीत भारतातील नंबर वन बनवले आहे, तिच्या दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका आणि OTT प्लॅटफॉर्म संपूर्ण भारत आणि दक्षिण आशियातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. एकता आर कपूर ही १९९४ मध्ये तिच्या आई-वडिलांसोबत बालाजी चित्रपटात पदार्पण केल्यापासून भारतीय टेलिव्हिजनमध्ये एक मोठी व्यक्ती बनली आहे. भारताच्या दूरचित्रवाणीला आकार देण्याचे, टेलिव्हिजन वरील आशय आणखी वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचे आणि भारताच्या सॅटेलाइट टेलिव्हिजन बूमला सुरुवात करण्याचे श्रेय तिला दिले जाते. बालाजी बॅनर अंतर्गत, तिने १७,००० तासांहून अधिक टेलिव्हिजन आणि ४५ चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच देशातील पहिल्या भारतीय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ALTBalaji लाँच केले आहे.

SL/KA/SL

30 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *