शेव टोमॅटो भाजी

 शेव टोमॅटो भाजी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

१५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

रतलामी शेव – २ वाट्या
टोमॅटो – ४ मध्यम आकाराचे चिरून
काश्मिरी लाल तिखट – २ टे स्पून
हळद – १ टी स्पून
साखर – १ टे स्पून
कसूरी मेथी – १ टे स्पून
ओवा – १ टी स्पून
जिरे -१ टी स्पून
हिरवी मिरची लसूण पेस्ट – १ टे स्पून
गरम मसाला – १ टी स्पून
तेल – ४ ते ५ टे स्पून
मीठ, हिंग – चवीनुसार
पाणी – ३ ते ४ वाट्या

क्रमवार पाककृती: 

एका कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की त्यात ओवा आणि जिरे घाला. नंतर हिरवी मिरची लसूण पेस्ट, हिंग,हळद, काश्मिरी लाल तिखट, टोमॅटो, मीठ, साखर घाला. टोमॅटो ५-७ मिनिटे शिजवुन घ्या. आता कसूरी मेथी घाला आणि पाणी घाला. पाण्याला चांगली उकळी आली कि गरम मसाला आणि शेव घाला. शेव अगदी आयत्या वेळी घालायची आहे. शेव घातल्यावर अजून २-३ मिनिट उकळी काढा.

Shaved tomato vegetables

ML/ML/PGB
13 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *