शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये तेजी. निफ्टीची नव्या विक्रमी उच्चतम स्तरावरती झेप.

 शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये तेजी. निफ्टीची नव्या विक्रमी उच्चतम स्तरावरती झेप.

मुंबई, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती कोरोनाच्या रुग्णसंख्येतील सातत्याने होणारी घट,अमेरिकेतील बेरोजगारीचे आकडे,तिमाही निकाल,अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येण्याचा आशावाद,लवकरच टाळेबंदी शिथिल होईल अश्या बातम्या,मंथली एक्सपायरी(Monthly Expiry) व जी.एस..टी(G.S.T) बैठक. या सगळ्याचा प्रभाव राहिला.या आठवड्यात निफ्टीने नवीन विक्रमी भाव नोंदवला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी. Nifty ends at fresh record high, Sensex at closing high
 
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सुरुवात तेजीने झाली. विदेशी बाजारातील चांगले संकेत, तसेच सलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येतील लक्षणीय घट व त्यामुळे हळू हळू अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येण्याचा आशावाद यामुळे सोमवारी बाजाराने चांगली सुरुवात केली. हिरोमोटो (HERO MOTO) ने आपले सगळे प्लांट्स सुरू करणार असे जाहीर केले व कामकाज एकाच शिफ्ट मध्ये चालू राहील असेही सांगितले. एस.बी. आय(SBI),एच डी.एफ.सी बँक(HDFC Bank)टी. सी .एस(TCS)तसेच लार्सन अँड टुब्रो(L&T) या समभागात चांगलीच तेजी होती त्यामुळे मार्केटला चांगलाच सपोर्ट मिळाला.निफ्टीने १५ मार्चनंतर प्रथमच १५,२००चा टप्पा पार केला. परंतु वरच्या स्तरावरती नफावसुली झाली. फार्मा(Pharma) क्षेत्रात चांगलीच तेजी होती. बाजाराने आपला बंद भाव हिरवे निशाण फडकवून दिला. Sensex, Nifty End Marginally Higher Led By Banks, OMCs. Markets end higher in the highly volatile session with Nifty near 15,200.
 
गुंतवणूकदारांनी केली वरच्या स्तरावर नफावसुली investors preferred to book profits at higher levels
 
विदेशी बाजारातले चांगले संकेत व आशियाई बाजारातील तेजी यामुळे मंगळवारी बाजाराने छान सुरुवात केली. कोरोनाचा कहर कमी होताना दिसत असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. महाराष्ट्र सरकार लवकरच टाळेबंदी शिथिल करेल अश्या बातम्यांनी बाजाराचा उत्साह अधिक वाढला. बाजारात तेजीवाल्यांचा दबदबा होता. गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफावसुली केली. आय.टी(I.T),मेटल(Metal),फार्मा(Pharma)आणि वाहन(Auto) क्षेत्रात(Sectors) चांगली खरेदी पाहावयास मिळाली. बँकिंग क्षेत्रात विक्रीचा जोर होता. एशियन पेन्ट्स(Asian Paints),टायटन(Titan),आयचरमोटर्स(EicherMotors),जे.एस. डब्लू स्टील(JSW Steel) आणि ब्रिटानिया(Britannia Industries) ह्या निफ्टी मधील शेअर्सचे प्रदर्शन चांगले राहिले. Sensex, Nifty Close Lacklustre Session Little Changed Amid Profit-Booking. Markets end with little change in the highly volatile session with selling seen in the financial names.
 
सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली दोन महिन्याची उच्चतम पातळी. Sensex,NiftyEnd At OverTwo-Month High.
 
विदेशी बाजारातील संमिश्र संकेत व लसीकरण मोहिमेतील तेजी यामुळे बुधवारी पुन्हा एकदा तेजीवाल्यानी बाजारावरती आपली पकड घट्ट केली. बाजारात नफावसुली झाली परंतु खालच्या स्तरावरून चांगली खरेदी झाली. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला. सेन्सेक्सने १२ मार्च नंतर प्रथमच ५१,००० चा स्तर पार केला. इन्फोसिस(INFOSYS) रिलायन्स(RIL) व लार्सन अँड टुब्रो(L&T) या शेअर्स मधील वाढीने निफ्टीला चांगला आधार मिळाला. मंथली एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर बाजाराने चांगला बंद दिला निफ्टीने १६ फेब्रुवारी नंतर १५,३०० चा बंद भाव दिला व सेन्सेक्सने ३८० अंकांची वाढ घेत ५१,०००च्या वरती बंद दिला. आय.टी((I.T) आणि वाहन(Auto) क्षेत्रात जोरदार खरेदी दिसली. Sensex ends above 51,000 ahead of the monthly F&O expiry session. Nifty 50 at 15,301. The volatility index skyrocketed 11.11%
 
निफ्टीने दिला विक्रमी बंद भाव. Nifty ends at record closing high
 
मंथली एक्सपायरीच्या दिवशी सकाळी बाजार विशिष्ट पातळीवरती फिरत होता.परंतु दुपारनंतर बाजाराने मे महिन्याचा मंथली एक्सपायरीचा(Monthly-Expiry) ७ वर्षातील बंद भाव नोंदवला. निफ्टीचा बंद भाव १५,३३७ होता.बँकिंग(Banking) आणि आय.टी(I.T) क्षेत्रात चांगली तेजी होती. मिडकॅप(Midcap) आणि स्मालकॅप(Smallcap) कंपन्यानी सुद्धा विक्रमी पातळीवर बंद नोंदवला.बाजाराची नजर अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकड्यांवरती होती. रिलायन्स देशातील सगळ्यात मोठा मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेणार आहे हा कार्यक्रम त्यांच्या कंपनीतील कर्मचारी व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांचे पार्टनर गुगल(Google) व बी.पी(B.P) ह्यांचे कर्मचारी ह्यांना लस देण्याचा आहे. लवकरच एक मदत पॅकेज(relief package) सरकार जाहीर करेल अशी बातमी बाजारात होती त्यामुळे हॉटेल व बांधकाम क्षेत्रातील शेअर्स मध्ये चांगली तेजी होती. Nifty ends at an all-time closing high of 15,338, up 36 points, and Sensex climbs 98 points to 51,115. Nifty ends at record closing high, Sensex gains led by IT, financials.
 
निफ्टीने नोंदवला नवीन विक्रमी बंद भाव. Nifty ends at fresh record high
 
जून सिरीजच्या पहिल्याच दिवशी निफ्टीने विक्रमी स्तर नोंदवला निफ्टीने १५४५०चा स्तर पार केला. विदेशी मजबूत संकेत व जी.एस..टी ची बैठक तसेच विजय मल्ल्याची जप्त प्रापर्टी बँकांकडे हस्तांतरण होणार व बँक त्या प्रॉपर्टीस लिलावात काढून वसुली करणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बाजरात उत्साहाचे वातावरण होते. जी.डी.पी. चे चांगले प्रदर्शन तसेच बेरोजगारीत झालेली घट यामुळे अमेरिकन बाजारात उत्साह आहे. कोरोनाचा कहर कमी होताना दिसत असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. रिलायन्स(RIL), एच डी.एफ.सी बँक(HDFC Bank) एच डी.एफ.सी (HDCF) आणि आय.सी आय.सी. आय (ICICI BANK) या कंपन्यांनी बाजाराला तगडा आधार दिला. शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक राहिला निफ्टीने१५,४६९ हा नवीन विक्रमी स्तर नोंदवला. निफ्टीने १५,४३५ हा बंद भाव दिला. Nifty ends at fresh record high, Sensex at closing high. Markets end higher with Nifty started June F&O series on strong note, hitting fresh record high amid positive global cues.
 
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
This week saw a steady decline in the number of corona patients on the market, US unemployment figures, quarterly results, optimism that the economy will get back on track, news that the lockout will soon ease, Monthly Expiry and G.S.T meetings. The Nifty hit a new record high this week. Investors should be cautious in the future and invest only in the long run.
JS/KA/PGB
29 May 2021
 

mmc

Related post