विविध देशातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक व्याजदर वाढीने बाजार गडगडला.
मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) :16 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजारात घसरण दिसून आली.रुपयातील कमजोरी आणि एफआयआयच्या विक्रीमुळे बाजार सलग दुसऱ्या आठवड्यात घसरला. आठवड्यात जाहीर झालेली देशांतर्गत घाऊक महागाई 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली तसेच युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटन या देशातील महागाईत देखील घट होताना दिसली तरीसुद्धा यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड), युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी) आणि बँक ऑफ इंग्लंड द्वारे केलेल्या दर वाढीमुळे जागतिक बाजारपेठात निराशेचे वातावरण पसरले. फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेने बाजाराला धक्का बसल्याने गुंतवणूकदारानी चहुबाजूनी विक्रीचा मारा केला.
मंदीची चिंता वाढल्याने शुक्रवारी वॉल स्ट्रीट सलग तिसऱ्या दिवशी घसरले. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष यू.के व अमेरिकेचा जाहीर होणाऱ्या GDP data कडे राहील.
Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीत घसरण होऊन निफ्टीने 18410-18365-18294-ह्या स्तरांना स्पर्श केला व शुक्रवारी 18255.15 चा तळ गाठला .तांत्रिकदृष्ट्या निफ्टीत कमकुवतपणा जाणवत आहे.
निफ्टीने शुक्रवारी 18269 चा बंद दिला आहे. येत्या आठवड्यात जर हा स्तर तुटला.तर निफ्टी मागील आठवड्यात सांगितल्याप्रमाणे 18246-18137-18117-17969 हे स्तर गाठेल
वर जाण्याकरिता निफ्टीला 18421-18541 हे स्तर पार करणे अति आवश्यक राहील.
IT sector short term pain long term gain
गेल्या दोन वर्षात सलग ५० %पेक्षा अधिक परतावा IT सेक्टर ने दिला असून सध्या ह्या क्षेत्रातील समभागात पडझड दिसत असून हे समभाग काहीसे मागे पडल्याचे चित्र आहे. गुंतवणूकदारांसाठी हि एक प्रकारची सुवर्णसंधी असल्याने ह्या क्षेत्रातील चांगल्या समभागात दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी.
बाजाराचा सपाट बंद.Sensex, Nifty end flat
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अत्यंत अस्थिर अश्या सत्रात बाजार सपाट बंद झाला. कमकुवत सुरुवातीनंतर बाजार काहीसा सावरला.महागाईचे आकडे व या आठवड्यात होणाऱ्या FOMC बैठकीच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारानी सावध पवित्र घेतला.आयटी समभागांमधील विक्री सुरूच राहिली त्यामुळे निर्देशांकात घसरण वाढली परंतु बँकिंग, धातू आणि तेल आणि वायूमध्ये झालेल्या रिकव्हरीमुळे बाजार सपाट बंद होण्यास मदत झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 51 अंकांनी घसरून 62,130 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 0.60 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,497 चा बंद दिला.
सेन्सेक्स ४०२ अंकांनी वधारला. Sensex gains 402 points
जागतिक बाजारात सकरात्मकता असून देखील मंगळवारी भारतीय बाजाराची सुरुवात सपाट नोटवर झाली. परंतु पुढील काही तासात बाजारात चांगलीच खरेदी दिसून आली.त्यासाठीचे प्रमुख कारण ठरले ते किरकोळ चलनवाढीचा दर जो सोमवारी 11 महिन्यांच्या नीचांकी 5.88 टक्के असा जाहीर झाला.यामुळे बाजारात तेजी पसरली व पीएसयू बँकांनी तेजीचे नेतृत्व केले. सोमवारी औद्योगिक उत्पादनाचे आकडे देखील जाहीर झाले ते निराशाजनक असल्याने बाजाराचा उत्साह अंशतः कमी होता,ऑक्टोबरमध्ये देशातील औद्योगिक उत्पादन चार टक्क्यांनी घटले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 402अंकांनी वधारून 62,533 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 110 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,608.चा बंद दिला.
FOMC बैठकीपूर्वी सेन्सेक्स 144 अंकांनी वधारला.
बुधवारी सकारात्मक सुरुवातीनंतर निर्देशाकानी हिरव्या रंगात राहणे पसंत केले. तसेच नोव्हेंबर 2022 मधील घाऊक महागाई 5.85 टक्क्यांवर म्हणजेच 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याने बढत घेतली.तथापि प्रॉफिट बुकींगने इंट्राडे नफा कमी झाला. पण सर्व क्षेत्रांमधील खरेदी,सकारात्मक जागतिक बाजार.महागाईच्या आकड्यातील घट आणि रात्री जाहीर होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगमध्ये व्याजदर कमी प्रमाणात वाढ होण्याच्या आशेने भारतीय बेंचमार्क निर्देशांक सलग दुस-या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 144अंकांनी वधारून 62,677 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 52 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,660 चा बंद दिला.
फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेने बाजाराला धक्का
यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर (50-bps)वाढवल्याने आणि आक्रमक भूमिका घेतल्याने जागतिक बाजारात मोठी घसरण झाली व याचे पडसाद गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात उमटले.BSE सेन्सेक्स सुमारे 879 अंकांनी घसरला.फेडच्या भूमिकेने बाजाराला धक्का बसला.तसेच फेडरल रिझर्व्हच्या विधानानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याच्या भीतीने देशांतर्गत बाजारातील आयटी समभागांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले.कमकुवत जागतिक बाजार आणि सर्व क्षेत्रांतील विक्री यामुळे भारतीय इक्विटी बाजाराच्या दोन दिवसाच्या तेजीला खीळ बसली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 878 अंकांनी घसरून 61,799 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 245 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,414 चा बंद दिला.
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण
गुरुवारी अमेरिकन बाजारातील निर्देशांकात झालेल्या मोठ्या घसरणीचा फटका शुक्रवारी आशियाई बाजार तसेच देशांतर्गत बाजाराला मोठ्या प्रमाणात बसला. मंदीची भीती निर्माण झाल्याने अमेरिकन बाजाराने तीन महिन्यातील आपली नीचांकी पातळी गाठली.तसेच गुरुवारी ECB आणि BoE ने महागाईवर नियंत्रण आणण्याकरिता दर अर्ध्या टक्क्यांनी वाढवून फेडचे अनुसरण केल्याने जागतिक बाजारपेठात निराशेचे वातावरण पसरले. कमकुवत सुरुवातीनंतर, बाजाराने रिकव्हरी केली परंतु सर्व क्षेत्रांतील विक्रीमुळे तो दबावाखाली राहिला आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सर्वाधिक विक्री ऑटो आणि आयटी समभागांमध्ये झाली.
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )
JS/KA/PGB
17 Dec 2022