महापुरुषांची टिंगल-टवाळी करणाऱ्या राज्यपालाना पदावर राहण्याचा अधिकार नाही – शरद पवार
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला.या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते.
या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वर सडकून टिका केली. महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केले असून अशा महापुरुषांची टिंगल-टवाळी करणाऱ्या राज्यपालाना राज्यपाल म्हणून पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही.
आज लोक शांत आहेत. राज्यपालांची जर वेळेत हकालपट्टी झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही पवार दिला.
आज राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला अशी टीका चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता पवार यांनी केली.
मी स्वत: राज्याच्या विधानभवनात जाऊन ५५ वर्षं झाली. या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम यांनी केलं. पण यावेळी राज्याच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम होत आहे. महात्मा फुले, सावित्रीबाईंबद्दल लाजिरवाणे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे असे पवार म्हणाले.
आजचा मोर्चा एक वेगळी स्थिती दाखवतो. ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले. शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात बाहेरचे मराठी भाषिक येण्याचा आग्रह करत आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार किंवा अन्य भागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी त्यांच्या भावनेशी राज्यातला मराठी माणूस सहभागी आहे असे सांगून पवार म्हणाले की,राज्यपाल यांनी महापुरुषा बद्दल जे अनुदगार काढले,ते ऐकून ही लोक आज शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा ही त्यांनी दिला.
ML/KA/PGB
17 Dec 2022