या शाळेत आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शंकर महादेवन देणार संगीत शिक्षण

 या शाळेत आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शंकर महादेवन देणार संगीत शिक्षण

डोंबिवली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निसर्गदत्त सुरेल गळा असुनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे संगिताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहतात. काही सेवाभावी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देण्याचे उपक्रम हाती घेतले जातात. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ या डोंबिवली येथील प्रतिथयश शिक्षण संस्थेकडून असाच एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

शिक्षण संस्था आणि आणि शंकर महादेवन ॲकेडमीतर्फे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांमध्ये गायनाची कौशल्ये असतात, पण त्यांना कौटुंबिक परिस्थिती किंवा अन्य आर्थिक कारणांमुळे योग्य दिशा, मार्गदर्शन मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांचा विचार करुन हा उपक्रम हाती घेतला आहे, असे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी सांगितले.
जगाच्या कोणत्याही भागात गेलो तरी संगीत हे आपल्याला तेथील समाज, संस्कृतीशी जोडून घेते. त्यामुळे इतर अभ्यासा बरोबर संगीत शिक्षणही अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीर टिळकनगर संस्था आणि शंकर महादेवन ॲकेडमीने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे, असेही डॉ घरत यांनी नमूद केले आहे.

प्रेरणादायी भारतीय प्रकल्प केंद्र नावाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्व प्रकारचे संगीत शिक्षण या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना देण्यात येईल, असे या प्रकल्पाचे प्रमुख डाॅ. कृष्णन शिवरमकृष्णन यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शंकर महादेवन ॲकेडमीचे विश्वस्त राजेंद्र प्रधान, पंडित मुकुंद मराठे, संस्था विश्वस्त श्रीकांत पावगी, आशीर्वाद बोंद्रे, अर्चना जोशी उपस्थित होते. पंडित मुकुंद मराठे यांनी विद्यार्थ्यांकडून बंदिशी गाऊन घेऊन अभिनव पध्दतीने या उपक्रमाचे उद्घाटन केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता संगीत शिक्षणाचा अभ्यास करणे म्हणजे संगीत साधना, असे पं. मराठे यांनी सांगितले.

SL/KA/SL

17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *