शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाचा काल शुभारंभ झाला. हा चित्रपट महोत्सव निर्मात्यांसाठी एकत्र येण्याची आणि जागतिक चित्रपटसृष्टीचे अनुभव घेण्याच्या उत्तम संधी प्रदान करतो असे उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागचा भारताचा उद्देश चित्रपटांमधील वैविध्य आणि एससीओ प्रदेशातील चित्रपट निर्मितीच्या शैली दाखवण्याचा आहे असे माहिती आणि प्रसारण मंत्री ठाकूर म्हणाले.
शांघाय सहकार्य संघटनेतील सर्व देशांमध्ये भारतीय चित्रपटांचे वेड आहे, या सर्व देशांमधील लोकांना जोडण्यात चित्रपटांची भूमिका महत्वाची आहे.
कथा सांगण्याच्या, समाजमन तयार करण्याच्या, एकमेकांची हृदये जवळ आणण्याच्या या महोत्सवात, या प्रदेशातील सर्व सदस्य मित्र देशांना प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा यावेळी परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यानी सांगितले.
भारतातील एससीओ चित्रपट महोत्सवाच्या या पहिल्याच वर्षी, स्पर्धा तसेच स्पर्धाबाह्य अशा दोन्ही विभागात, 14 देशांमधील 58 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
ML/KA/SL
28 Jan. 2023