कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी , शामसुंदर महाराज सोन्नर !

 कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी , शामसुंदर महाराज सोन्नर !

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्याचे सुपूत्र आणि महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.Shamsundar Maharaj Sonnar as the chairman of the Kirtan meeting!

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे होणा-या कीर्तनसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ञ, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष अभय महाराज टिळक यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कीर्तनकार सहभागी होणार आहेत.

सारर्थी फाऊंडेशन गडहिंग्लज Sararthi Foundation Gadhinglaj आणि समस्त आजरा वारकरी परिवार यांच्या संयोजनात बुधवार 21 डिसेंबर रोजी गडहिंग्लज येथे होणा-या कीर्तनसंमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदाची जबाबदारी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शित्रे सांभाळत आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ रंधवे उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनात होणा-या विविध परिसंवादात देवदत्त परुळेकर, संपत देसाई, ताई महाराज मंगळवेडेकर, धर्मकीर्ती महाराज परभणीकर, ज्ञानेश्वर महाराज बंडगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सुहास महाराज फडतरे यांचे यावेळी कीर्तन होणार आहे. या संमेलनास सर्व वारकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक मुकुंदकाका देसाई यांनी केले आहे.

ML/KA/PGB
11 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *