आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन झाले स्वस्त

 आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन झाले स्वस्त

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच आता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दिल्ली, मुंबई (mumbai petrol rate), कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये ट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

21 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.Fuel became cheaper in the international market

मेट्रो शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई: पेट्रोलची किंमत: १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत: ९४.२७ प्रति लिटर
दिल्ली: पेट्रोलची किंमत: ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत: ८९.६२ रुपये प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल: १०१.९४ रुपये प्रति लिटर, डिझेल: ८७.८९ रुपये प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोलची किंमत: १०२.६३ रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत: ९४.२४ रुपये प्रति लिटर

आता आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन स्वस्त झाल्यामुळे देशातही हे दर लागू करण्यात येऊन त्यानुसार पेट्रोल , डिझेल स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे.

ML/KA/PGB
11 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *