महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला.
मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे ७ हजार ५०० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मंत्री लोढा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.Shakti Digital Van to promote women entrepreneurship
याप्रसंगी मास्टर कार्डचे संचालक रोहन सिरकर, लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार मोहम्मद अमीर एजाज, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, बँकेचे व्यवस्थापक मिलिंद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/PGB
25 Feb. 2023