सच्चर आयोगाप्रमाणे शिया मुस्लिमांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करा

 सच्चर आयोगाप्रमाणे शिया मुस्लिमांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सच्चर आयोगाप्रमाणे शिया मुस्लिमांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी,ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली.Set up a separate commission for Shia Muslims like the Sachar Commission

4 डिसेंबर रोजी मुंबई मस्जिद-ए-इराणी,भेंडी बाजार,मोहम्मद अली रोड, मुंबई येथे ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे वर्षीक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या वार्षिक संम्मेलनात देशभरातून शिया मुस्लिम समाजातील धार्मिक उलेमा,राजकीय क्षेत्रात कार्यरत नेते,विचारवंत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत या संम्मेलनात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून भारत आणि राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यावर विचार मंथन होणार आहे.

सौदी अरेबियात जन्नत-उल-बकी मदिना मुनव्वरामध्ये रौज बांधण्याची मागणी करण्यात येणार आहे. सच्चर आयोगाप्रमाणे शिया मुस्लिमांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी. सरकारने अल्पसंख्याकांना दिलेल्या वाट्यामध्ये शिया लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा दिला जावा.

आर्थिक मागासलेपणाच्या आधारे नोकऱ्यांमध्ये शिया आरक्षणाची मागणी तसेच देशभरात 8 कोटी शिया असल्याने त्यांना सन्मान मिळावा याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सय्यद सय्यम मेहदी यांनी दिली.

निकाह मध्ये अनावश्यक खर्चात शिया समाजाकडून कपात व्हावी , दहशतवादाची घटना भारतात आणि संपूर्ण जगात पसरली तो थांबवण्याचा प्रस्ताव यात सादर होईल.
देशातील प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिया वक्फ बोर्डाची निर्मिती आणि शिया वक्फ मालमत्तेवर देखरेख आणि सुरक्षा मिळावी.शिया लोकांच्या धार्मिक आणि लोकप्रिय शिक्षणात सुधारणा आणि प्रगतीसाठी प्रस्ताव आणले जातील असे सैय्यद नवाब यांनी सांगितले.Set up a separate commission for Shia Muslims like the Sachar Commission

या पत्रकार परिषदेला मौलाना यासूब अब्बास, उपाध्यक्ष,मौलाना सय्यद जहीर अब्बास, मौलाना एजाज अतहर आणि सरदार नवाब उपस्थित होते.

SW/KA/PGB
2 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *