SECI च्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास रिलायन्स पॉवरला मनाई

 SECI च्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास रिलायन्स पॉवरला मनाई

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स पॉवर कंपनी काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींतून मार्ग काढत बाजारात पुन्हा एकदा जम बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात आता या ही कंपनीवर बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी आणखी एका आर्थिक अडचणीत सापडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SECI) निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास रिलायन्स पॉवर लिमिटेड, तिच्या उपकंपन्या आणि रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेडला मनाई करण्यात आली आहे. त्याचा फटका नजिकच्या काळात कंपनीला बसणार आहे.

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (SECI) जूनमध्ये निविदा काढली होती. या माध्यमातून सोलर एनर्जी कॉर्पोरेशननं १००० मेगावॅट/२००० मेगावॉट स्वतंत्र बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी निविदा भरताना अनिल अंबानी यांच्या कंपन्यांनी कथित बनावट कागदपत्रं सादर केल्याचं समोर आलं आहे. यानंतर सरकारी कंपनीनं ही बंदी घातली आहे. तसंच, निविदा प्रक्रिया देखील रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेड (आता रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड) ने सादर केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) च्या बदल्यात बँक गॅरंटीचा पुरावा बनावट असल्याचं आढळलं आहे, असं सोलर एनर्जी कॉर्पोरेशननं म्हटलं आहे. रिलायन्स पॉवर, तिच्या उपकंपन्या आणि रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेडवरील बंदी ६ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाली आहे.

SL/ML/SL

8 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *