शास्त्रज्ञांनी तयार केले स्वप्न रेकॉर्ड करणारे मशिन
टोकियो, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वप्नामध्ये दिसणाऱ्या विविध घटना, व्यक्ती, प्रसंग यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. काहीवेळा आपल्याला जागे झाल्यावर स्वप्न आठवतात. तर काहीवेळा आठवत नाहीत. जगभरातील शास्त्रज्ञ स्वप्नांच्या दुनियेला वैज्ञानिक कसोट्यांवर उलगडण्याचा प्रयत्न करत असतात. AI च्या मदतीने ही स्वप्न आता रेकॉर्ड करता येणार आहेत. जपानमधील शास्त्रज्ञांनी स्वप्न रेकॉर्ड करणारे मशीन तयार केले आहे. हे मशिन ब्रेन इमेजिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसने (AI) मिळून तयार केले आहे. हे एक क्रांतीकारी संशोधन मानले जात आहे.
संशोधकांनी मेंदूच्या एक्टिव्हिटीज समजून घेण्यासाठी प्रगत न्यूरल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये स्वप्ने रेकॉर्ड करण्यासाठी मेंदूच्या सर्व क्रिया रेकॉर्ड केल्या जातात. विशेषत: झोपेच्या वेळी सर्वात जास्त रॅपिड आय मूव्हमेंट असते. एआय वापर करुन मेंदूच्या लहरींचे नमुने ड्रीम सिक्वेन्समध्ये रूपांतरित केले जातात. त्यामुळे ते पुन्हा दाखवता येतात. या यंत्रामुळे संशोधकांना स्वप्नांच्या अभ्यासातील नवीन गोष्टी समजण्यास मदत होऊ शकते.
तज्ञांच्या मते, हे उपकरण केवळ वैयक्तिक अनुभव समजून घेण्यास मदत करणार नाही तर मानसिक आरोग्य अन् समस्यांचे विश्लेषण यामुळे होणार आहे. स्वप्न रेकॉर्डिंग यंत्राच्या मदतीने डॉक्टर रुग्णांची मानसिक स्थिती आणि भावनिक आव्हाने चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. हे उपकरण क्रांतीकारी ठरणार आहे. परंतु संशोधकांना रेकॉर्ड केलेल्या व्यक्तीची माहिती सुरक्षित राहील आणि तिचा वापर केवळ संशोधन किंवा वैद्यकीय हेतूंसाठी केले जाईल, हे निश्चित करावे लागणार आहे
SL/ML/SL
1 Oct. 2024