ऊसाची शास्त्रशुद्ध लागवडच फायदेशीर

 ऊसाची शास्त्रशुद्ध लागवडच फायदेशीर

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उसातून उत्पन्न वाढविण्यासाठी जमिनीची सुपीकता आणि लागवड पद्धत खूप महत्त्वाची आहे, शास्त्रशुद्ध लागवड केल्यास ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास ऊसशेती अभ्यासक डॉ. संजीव माने यांनी व्यक्त केला.scientific cultivation of sugarcane is beneficial

जिल्हा कृषी विभागाने आयोजित केलेल्या ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर सांगली येथे ते बोलत होते. एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांनी काम करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.He gave such advice this time.

एका एकरात 60 हजार फुटवे येतील अशीच उसाची लागण करावी, असे सांगून संजीव माने म्हणाले, scientific cultivation of sugarcane is beneficial कितीही दाट उसाची लागण केलीतरी 40 हजार पक्व उसाचे उत्पादन मिळते. लागण करण्यापुर्वी कीटकनाशक व बुरशीनाशक यात दहा मिनिटे ऊस कांडी बुडवून ठेवावी, दोन् इंच पेक्षा जास्त कांडी जमिनीत गाडू नये, दाट लागण केल्यास उसाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ML/KA/PGB

19 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *