राज्यात देवस्थानांच्या हजारो एकर जमिनीचा घोटाळा

 राज्यात देवस्थानांच्या हजारो एकर जमिनीचा घोटाळा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशररित्या हस्तांतरित करून त्या विक्री करण्यात आल्या असून त्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केला , अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना ते बोलत होते.Scam of thousands of acres of land of temples in the state

यातील अनेक जमिनींचे खोटे वारस तयार करण्यात आले आहेत, खोटी कागदपत्रे तयार करून विक्रिव्यवहार पूर्ण करण्यात आले असून या सगळ्याची चौकशी येत्या महिनाभरात करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली, चर्चेदरम्यान त्यांनी यातील अनेक उदाहरणे देत संबधित कागदपत्रे सादर करतो असं मंत्र्यांना सांगितलं.

अर्थसंकल्पातील नव्या रस्त्यांच्या घोषणेसाठी आर्थिक तरतूद कुठे आहे असा सवाल त्यांनी केला. मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले असताना नवीन सागरी मार्ग काढण्याची घोषणा झाली आहे, नागपूर ते गोवा शक्ती मार्ग जाहीर केला आहे, यासाठी पैसे कुठून आणणार आहात ते स्पष्ट करा अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

ML/KA/PGB
20 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *