ब्रशिंग स्कॅम: ऑनलाइन खरेदीदारांना लक्ष्य करणारी नवीन फसवणूक!

 ब्रशिंग स्कॅम: ऑनलाइन खरेदीदारांना लक्ष्य करणारी नवीन फसवणूक!

मुंबई, दि. 22 (जितेश सावंत) :ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत सायबर गुन्हेगार देखील नवीन क्लृप्त्या लढवत आहेत. सध्या एक नवीन ऑनलाइन फसवणूक ‘ब्रशिंग स्कॅम’ मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, जिथे अनोळखी लोकांना अनपेक्षित पार्सल पाठवले जातात आणि त्यांच्या नावाने खोटी पुनरावलोकने (fake reviews) पोस्ट केली जातात.

ब्रशिंग स्कॅम म्हणजे काय

स्कॅमर्स अनपेक्षित पार्सल पाठवतात – ऑनलाइन खरेदीदारांना त्यांच्या नकळत पार्सल मिळते.

खोटी पुनरावलोकने पोस्ट केली जातात – पार्सल मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने पाच-तारांकित (5-star) पुनरावलोकने लिहिली जातात.

डेटा चोरीचा धोका – हे पार्सल तुमचा व्यक्तिगत डेटा चोरी करण्याचा एक प्रकार असतो.

QR कोडचा सापळा – काही पार्सलमध्ये QR कोड असतो, जो स्कॅन केल्यास तुमची गोपनीय माहिती चोरी होऊ शकते किंवा तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर (malware) इंस्टॉल होऊ शकतो.

फसवणुकीचा मूळ उगम:

‘ब्रशिंग’ ही संकल्पना चिनी ई-कॉमर्स पद्धतीतून आलेली आहे, जिथे विक्रेते बनावट ऑर्डर्स आणि पुनरावलोकनांद्वारे उत्पादनांचे रेटिंग वाढवतात.

बनावट लोकप्रियता: स्कॅमर्स स्वस्त वस्तू जसे की कॉस्च्युम ज्वेलरी, छोटे गॅझेट्स किंवा बियाणे पाठवतात आणि नंतर त्याच्या नावाने खोटी पुनरावलोकने टाकतात.

डेटा हॅकिंग: ही माहिती डेटा ब्रीच किंवा बेकायदेशीररीत्या खरेदी करून मिळवली जाते, ज्यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा फसवणुकीसाठी वापरला जाऊ शकतो.

सायबर गुन्हेगारीचा धोका:

McAfee अहवालानुसार, हा स्कॅम प्रामाणिक खरेदीदारांना फसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या नावाचा गैरवापर करतो.

ब्रशिंग स्कॅममुळे कोणते धोके संभवतात?

फसव्या पुनरावलोकनांवर(बनावट रिव्ह्यूज) विश्वास ठेवून चुकीची खरेदी होण्याचा धोका.

तुमच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापर होऊन ओळख चोरी (identity theft) होण्याचा धोका.

QR कोड स्कॅन केल्यास फिशिंग हल्ला (phishing attack) किंवा आर्थिक फसवणुकीचा धोका.

ब्रशिंग स्कॅमपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे?

अनपेक्षित QR कोड स्कॅन करू नका – कोणत्याही अनोळखी पार्सलमधील QR कोड स्कॅन करणं टाळा.

तुमच्या ई-कॉमर्स खात्याला संरक्षण द्या – पासवर्ड नियमितपणे बदला आणि 2-स्तरीय प्रमाणीकरण (2FA) सक्रिय करा.

संशयास्पद पार्सलची तक्रार करा – तुम्हाला अशा प्रकारचे पार्सल मिळाल्यास, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि स्थानिक अधिकाऱ्यांना त्वरित कळवा.

सावध राहा, सायबर गुन्हेगारांना संधी देऊ नका!

संबंधित कायदा: माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 चा कलम 66

Brushing Scam: A New Online Fraud Targeting Shoppers!

With the rise of online shopping, cybercriminals are devising new scams. One such emerging fraud is the Brushing Scam, where scammers send

unsolicited parcels to people and post fake 5-star reviews using their names.

How Does the Brushing Scam Work?

Unsolicited Packages: Scammers send random parcels to unsuspecting users.

Fake Reviews: After delivery, they post fake positive reviews in the recipient’s name.

Data Theft: Personal data is often obtained through breaches or illegal purchases.

QR Code Trap: Some parcels contain QR codes leading to phishing sites or malware installation.

Risks Involved

Misleading purchases due to fake product ratings.

Identity theft and misuse of personal data.

Phishing attacks** and financial fraud through malicious QR codes

How to Stay Safe?

Avoid scanning unknown QR codes.

Update passwords & enable 2FA on e-commerce accounts.

Report suspicious parcels to e-commerce platforms and authorities.

Relevant sections: section 66 of the Information Technology Act, 2000.

लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.

The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

ML/ML/PGB 7 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *