‘सेव्ह द अर्थ कॉन्क्लेव्ह’, 22 ला राजधानीत
 
					
    मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल ला ‘सेव्ह द अर्थ कॉन्क्लेव्ह’ – बांबू क्षेत्रावर विशेष भर या विषयावर राजधानीतील सुब्रमण्यम ऑडिटोरियम, पुसा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला
आहे.
पत्रकार परिषद मध्ये बोलताना भाजप नेते पाशा पटेल म्हणाले की,हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. तसेच
या कार्यक्रमास गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , मंत्री भूपेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत.
शिवाय देशातील आठ ते दहा राज्यातील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
या सोबत आफ्रिकन अशियन रुरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (AARDO) या आंतरराष्ट्रीय संस्थाचे विविध देशातील प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
हवामान बदल हा सध्याच्या काळातील सर्वात गंभीर जागतिक प्रश्न बनला आहे. जो परिसंस्था, अर्थव्यवस्था आणि संपूर्ण समाजव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे करतो. जागतिक हवामान संघटना (WMO) च्या ताज्या अहवालानुसार, २०२४ हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले असून जागतिक तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत १.५०८ ने अधिक वाढले आहे. यामुळे या विषयावर तातडीने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. शाश्वत विकास हा केवळ एक पर्याय नसून तो आपल्या प्रगतीचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि पर्यावरणीय जाणीव सर्वच क्षेत्रांमध्ये समाविष्ट केली पाहिजे.
पृथ्वी वाचवण्यासाठी आता देश पातळीवर काम होणार आहे.
सेव्ह द अर्थ कॉन्क्लेव्ह फिनिक्स फाउंडेशन संस्था, लोदगा, लातूर, भारती पब्लिक पॉलिसी इंस्टिट्यूट, ISB, हैदराबाद: इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रीकल्चर (ICFA), नवी दिल्ली आणि आफ्रिकन एशियन रुरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (AARDO), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या एकदिवसीय परिसंवादात पर्यावरणीय शाश्वतता आणि धोरणात्मक कृती यावर विचारमंथन होईल.
या परिषदेच्या माध्यमातून अमित शहा यांच्या सहकार विभागाला देशातील सहकारी संस्थांमार्फत बांबू लागवड सुरू करावी अशी विनंती करण्यात येणार आहे.
 
                             
                                     
                                    