राज्यात तीस मार्च पासून सावरकर गौरव यात्रा…
नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात येत्या 30 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत काढण्यात येईल. महाराष्ट्राच्या विविध विभागात आयोजित होणाऱ्या या गौरव यात्रा ची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद व्यक्तव्य करून काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने सावरकरांचा अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ ‘सावरकर गौरव यात्रा’ महाराष्ट्रभर काढण्यात येईल. रथाच्या माध्यमातून सावरकरांचे कार्य लोकां लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल , असे त्यांनी यावेळी सांगितले.Savarkar Gaurav Yatra in the state from March 30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे जाहीर करावे. परंतू केवळ सत्तेसाठी ते काँग्रेस सोबत आहेत असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पत्रकार परिषदेत केला.
ML/KA/PGB
28 Mar. 2023