सत्यजित पाटील यांची उमेदवारी दाखल

कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार (शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार) सत्यजित पाटील सरूडकर यांनी आज कोल्हापुरात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नाईक माजी आमदार सुजित मिणचेकर आदी नेत्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
ML/ML/SL
16 April 2024