संजय राऊतानी पाडली विधानसभा बंद

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल राऊत यांच्यावर हक्क भंग दाखल करण्याची मागणी भाजपा च्या अतुल भातखळकर यांनी अध्यक्षांना दिले आणि त्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे कामकाज अनेक वेळ तहकूब करावे लागले आणि शेवटी दिवसरासाठी स्थगित करण्यात आले.
हा मुद्दा आज कामकाज सुरू होताच आशीष शेलार यांनी उपस्थित केला, राऊत यांच्या विधानाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत सभागृहाने बोटचेपी भूमिका घेऊ नये अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी असे कोणीही म्हणणे गैर आहे मात्र अशा वक्तव्याची खात्री करून घ्यावी असं मत व्यक्त केलं.
अतुल भातखळकर यांनीही यावर तीव्र भावना व्यक्त केल्या . शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी राऊत यांच्या विधानाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या, तातडीने हक्क भंग दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या भावना व्यक्त होत असल्याने प्रश्नोत्तराचा तास सुरू झालाच नाही. बाळासाहेब थोरात यांनी ही विधिमंडळ आदराचे स्थान आहे, त्यांचे म्हणणे तपासून पहा, दोन्ही बाजूने शब्दांचा वापर जपून केला पाहिजे असं सांगितलं.
रवींद्र वायकर यांनी गोगावले यांच्या शब्दांवर आक्षेप घेतला . अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्तारूढ बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली , ते जागा सोडून पुढे आले, त्यामुळे कामकाज दहा मिनिटे तहकूब झाले.
कामकाज सुरू होताच पुन्हा गदारोळ , तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज पुन्हा वीस मिनिटासाठी तहकूब केले, पुन्हा कामकाज सुरू होताच भरत गोगावले यांनी उच्चारलेले काही शब्द मागे घेतले , त्यानंतर पुन्हा गदारोळ कामकाज अर्धा तास तहकूब, प्रश्नोत्तराचा तास झालाच नाही , त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटे कामकाज तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अतुल भातखळकर यांनी प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती अध्यक्षांना केली , त्याला संजय शिरसाट अनुमोदन दिलं, भास्कर जाधव यांनी देखील असं वक्तव्य करणे अयोग्य असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यानी विरोधकांना वापरलेली भाषा ही योग्य नसल्याचं सांगितलं. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या,आम्ही चोर असू तर आमची मते घेऊन निवडून का आले असा सवाल त्यांनी केला. Sanjay Raut मंत्री शंभूराज देसाई यांनी ही तीव्र भावना व्यक्त केल्या.
आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
नाना पटोले यांनी याबाबत अध्यक्षांना थेट अधिकार आहेत असं सांगितलं. नितेश राणे, कालिदास कोळंबकर यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या. अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्या विधानाबद्दल त्यांच्यावर हक्कभंग सूचना दिली आहे, यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, तर घटनेचा अवमान करणारी आहे, यामुळे सदस्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे पुढील दोन दिवसात यावर चौकशी करून पुढील निर्णय मी जाहीर करेन असं अध्यक्षांनी जाहीर केलं. यावर सत्तारूढ सदस्य असहमत झाले , ते जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला शेवटी अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
ML/KA/PGB
1 Mar. 2023