मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून संजय दिना पाटील विजयी
मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. संजय दिना पाटील यांना ४ लाख ५० हजार ९३७ एवढी मते मिळाली, तर श्री. कोटेचा यांना ४ लाख २१ हजार ७६ मते मिळाली. या मतदारसंघासाठी मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी (पूर्व) येथे आज सकाळपासून सुरू झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी विजयी उमेदवार संजय दिना पाटील यांच्या नावाची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले. या भागात 94 हजार 378 पुरुष, तर 85 हजार 357 महिलांनी मतदान केले. ईशान्य मुंबईत एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 9 लाख 22 हजार 760 मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवला.
ML/ML/SL
4 June 2024