अमेठीतून स्मृती इराणी पराभूत, काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा विजयी
अमेठी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर) : मागच्या लोकसभा निवडणूकीत अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघात विजयी झालेल्या भाजपच्या स्मृती इराणींना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीच्या जागेवर स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे. त्या 1.30 लाख मतांनी पराभूत झाल्या. काँग्रेसचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे किशोरी लाल शर्मा यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. राहुल-प्रियांका यांनी आखलेली रणनीती यावेळी यशस्वी ठरली आहे. स्मृतींनी पाच वर्षांत लोकांचा विश्वास गमावला. अमेठीतील मतदारांचा कौल समजून घेण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
काँग्रेसचे किशोरी लाल शर्मांनी यांनी स्मृती इराणी यांचा तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभव केला आहे. स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदरासंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या उमेदवाराने अमेठीत स्मृती इराणींना पराभूत करत निवडणूक जागा जिंकली.
अमेठीत झालेल्या या विजया नंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भाजपा लोकांचा आदर करत नाही, आदराने बोलत नाहीत. किशोरी लाल शर्मा हे ४० वर्षांपासून अमेठीत काँग्रेससाठी काम करत आहेत आणि त्यांचं अमेठीच्या जनतेबरोबर नातं आहे. कदाचित भाजपाच्या लोकांना ही गोष्ट समजली नाही की किशोरी लाल शर्मा हे अमेठीशी खूप चांगल्या रितीने जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की ते चांगल्या फरकाने जिंकले आहेत. ते पीए आहेत असं त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, त्यांनी या गोष्टी म्हणायला नको होत्या.”
SL/ML/SL
4 June 2024