अजित दादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
मुंबई, दि २८
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरू न शकणारी आहे. ईशान्य मुंबई
खासदार संजय दिना पाटील यावेळी म्हणाले की, माझे पवार कुटुंबीयांचे अतिशय घनिष्ठ संबंध असून राष्ट्रवादीत असताना दादांशी नेहमी चर्चा होत असे, त्यांचा जनता दरबार असो वा मंत्रालय ते नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवताना दिसत असे. सर्वांचे लाडके नेता असलेले दादा आज आपल्यात नाहीत. महाराष्ट्राची ही खूप मोठी हानी असून त्यांना माझ्या कुटुंबियांकडून भावपूर्ण आदरांजली.