ग्रामीण महिलांसाठी sanitary pads सरकारकडून

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामीण भागातील शाळकरी मुली आणि महिला बचत गटाच्या सदस्या यांना नाममात्र अथवा मोफत sanitary pads तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी एका महिन्यात निविदा काढण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत केली.
यापूर्वीची योजना २०२२ पर्यंत होती त्यात पाच रुपयात आठ pads शाळकरी मुलींना तर २४ रुपयात बचत गटांना दिले जात होते , मात्र ही योजना संपली आहे, ती पुन्हा सुरू केली जाईल असं ते म्हणाले.
हे pads रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्यासाठी ही विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.हा मूळ प्रश्न नमिता मुंदडा यांनी उपस्थित केला होता त्यावर वर्षा गायकवाड , भारती लवेकर यांनी उपप्रश्र्न विचारले.
सडक योजना गुणवत्तापूर्ण
प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वस्तू आणि सेवा कर बुडवणाऱ्या कंत्राटदारांकडून तो त्वरित वसूल केला जाईल, ही रक्कम २८ कोटींची आहे अशी माहिती ही गिरीश महाजन यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली, हा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता. Sanitary pads for rural women from Govt
अशा रस्त्यांची बांधणी यापुढे सिमेंट काँक्रिट चा वरचा थर देऊन गुणवत्ता टिकवली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
ML/KA/PGB
10 Mar. 2023