सानिया- रोहनचा ऑट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश
भारताची टेनीस स्टार जोडी सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताच्या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे.
सानियानं याआधीच टेनिस विश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ग्रँड स्लॅम स्पर्धा तिची अखेरची स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर विजयानं करिअरचा शेवट करण्याचा मानस असेल असे मानण्यात येत आहे.
दरम्यान, उपांत्य पूर्व सामन्यात जेलेना ओस्टापेंको आणि डेविड वेगा हर्नांडेज यांच्या जोडीनं माघार घेतल्यामुळे बाय मिळाला होती. उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्यासाठी सानिया आणि रोहन या भारताच्या जोडीनं उरुग्वे आणि जापानच्या एरियल बेहार आणि मकाटो निनोमिया या जोडीचा 6-4, 7-6 (11-9) अशा फरकानं पराभव केला होता. उपांत्य फेरीत भारताच्या स्टार जोडीनं विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे
SL/KA/SL
25 Jan. 2023