शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट, दोघेजण गंभीर जखमी
सांगली दि २२ : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील भाळवणी गावात मुल्ला फायर वर्क्स या शोभेच्या दारूच्या कारखान्यात आज सकाळी दहा वाजता शोभेच्या दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की याच्या आवाजाने भाळवणी गाव व त्याच्यापासून पाच किलोमीटरची जमीन हादरली.
अनेक गाड्यांच्या काचांना तडे गेले तर गावातील घरामध्ये असणारी कपाटातील सर्व भांडी खाली पडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आफताब मन्सूर मुल्ला व अमीन मुल्ला हे दोघेजण गंभीर रित्या जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. घटनास्थळावर मदतीसाठी अनेक लोक धाऊन गेले आहेत. मात्र अचानकच हा स्फोट झाल्याने परिसर हादरला आहे.ML/ML/MS