जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाचसंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात
कोल्हापूर दि. ९(एमएमसी न्यूज नेटवर्क) :- कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागून ते त्यात जळून भस्मसात झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
या घटनेने कलाप्रेमी कोल्हापूरकर अक्षरश: ओक्साबोक्शी रडले.
करवीरनगरीचे भूषण असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आग एवढी प्रचंड होती की यामध्ये निम्मे नाट्यगृह जळून खाक झाले. आगीच्या या अक्राळविक्राळ रूपाने अनेकांच्या पोटात गोळाच आला. शर्थीच्या प्रयत्नांनी सुदैवाने दर्शनीभाग शाबूत राहिला असला तरी नाट्यगृहाचे संपूर्ण छप्पर आणि आतील संपूर्ण खुर्च्यासह विद्युत आणि अन्य यंत्रणा निकामी झाली आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या रात्रीच झालेल्या या दुर्घटनेमुळे कोल्हापूरकर हळहळले.
परंतु राजर्षी शाहू महाराजांचा हा वारसा पुन्हा एकवार उभारू, असा निर्धारही यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
सुदैवाने नाट्यगृहात कोणताच सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने धोका टळला. दरम्यान
नाट्यगृहाच्या १०० मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल रात्री साडेनऊच्या
सुमारास नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूने आग लागल्याचे खाऊगल्लीतील एका विक्रेत्याच्या लक्षात आले. त्याने आत येऊनपरिस्थिती पाहिली. इतक्यात तिथे असलेल्या वातानुकुलन यंत्रणेतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग भडकली. नाट्यगृहास आग लागली ती मागील शाहू खासबागकडील बाजूने. अगोदर तेथील लाकडी साहित्याने पेट घेतला आणि बघता बघता आगीने नाट्यगृहास कवेत घेतले.
याच ठिकाणी कुस्तीच्या मॅट
असल्याने त्यांनीही पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच सर्व केंद्रांवरील पाण्याचे बंब नाट्यगृहाकडे निघाले.
इतक्यात वाराईमाम तालमीचे
कार्यकर्तेही मदतीसाठी धावले.
अचानक आग लागल्याने
कोणत्या दिशेने अग्निशमन
गाड्या आतमध्ये न्यायच्या हे
प्रशासनालाही तत्काळ सूचत
नव्हते. मात्र, स्थानिक नागरिक,
दुकानदारांनी याकामी मदत
करत कोणत्या दिशेला काय
आहे. गाड्या कोणत्या दिशेने
न्यायच्या याकामी मदत केल्याने आगीवर नियंत्रण मिळाले.
नाट्यगृहाच्या उजव्या बाजूंनी पहिल्यांदा बंबांनी पाणी मारून आग विझवण्यास सुरुवात केली. पाठीमागून आलेल्या बंबांनी मुतारीकडील कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी लागलेल्या आगीत मुख्य रंगमंच आणि खुर्च्या अशा जळून खाक झाल्या. बाजूकडून पाण्याचा मारा सुरू केला. परंतु पाठीमागून जोरदार वारे असल्याने आणि लाकडी साहित्यामुळे आग भडकत निघाली. जवानांनी शर्थीचे
प्रयत्न सुरू केले. परंतु अशातच जिन्यावरील पत्रे पडायला सुरुवात झाली. कौलांच्या खाली संपूर्ण लाकडी रिपा असल्याने ही आग आणखी भडकली. त्याचे निखारे नाट्यगृहाच्या गॅलरीत पडले आणि फोमच्या खुर्च्यानीही पेट घेतला. वरील खुर्च्याची आग खालीही पसरली आणि खालूनही
आगडोंब उसळला. दोन्ही बाजूंनी पाणी मारून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी वाऱ्यामुळे भडकणारी आग विझविणे अशक्यप्राय वाटू लागले.
अशातच नाट्यगृहाच्या पुढील बाजूचे छप्परही पेटायला सुरुवात झाली.आता संपूर्ण इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार अशी भीती वाटू लागली परंतु पाऊण तासांत या ठिकाणी टर्न टेबल लॅडर आणण्यात आले. त्याच्या शिड्या उलगडून पाण्याचा फवारा उंचावरून छपरावर मारण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर दर्शनी भाग बचावला.
दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडून दहा कोटींचा निधी नाट्यगृह
संगीतसूर्य केशवराव भोसले
नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली होती.
या वास्तूत संगीत नाट्यकलेची
बीजेदेखील रुजली गेली.
आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे. पण या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी तत्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.
सरकार या वास्तूच्या पुनः
उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल. यासह सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आमदार, खासदार फंडातून निधी देऊन
कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
नाट्यप्रेमी, संगीतप्रेमी,कलाकारांमध्ये हळहळया संपूर्ण घटनेची माहितीक्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविली.