दिल्लीतील मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना जामीन मंजूर
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं योग्य नाही, नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. “मनीष सिसोदिया हे दीर्घकाळापासून तुरुंगात आहे. अशा प्रकारे त्यांना तुरुंगात ठेवणं योग्य नाही. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे, हे सत्र व उच्च न्यायालयाने समजून घेणं गरजेचं आहे”, अशी टीप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली.
ML/ML/PGB
9 Aug 2024