मुंबई आणि परीसरामध्‍ये 45 ठिकाणी कांद्याची अनुदानित दराने विक्री सुरु

 मुंबई आणि परीसरामध्‍ये 45 ठिकाणी कांद्याची अनुदानित दराने विक्री सुरु

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारकडून मागील आठवड्यात कांद्याची किरकोळ विक्रीसाठीच्या फिरत्‍या वाहनाला हिरवा झेंडा दाखवत 35 रूपये प्रतिकिलो या दराने कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्‍यात आली आहे. कांद्याची किरकोळ विक्रीची सुविधा एनसीसीएफ आणि नाफेड च्या विक्री केंद्रावर आणि . मोबाईल व्हॅनद्वारे प्रमुख उपभोग केंद्रांमध्ये, म्हणजे, दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्री सुरू झाली आणि नंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी या सुविधेचा विस्तार करण्यात आला. मुंबई चेन्नई, कोलकाता, पाटणा, रांची, भुवनेश्वर, गुवाहाटी येथे सुरू झालेल्या कांदा विक्री स्‍थळांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे. मुंबई शहर आणि परिसरात मिळून 45 ठिकाणे स्‍वस्‍त, अनुदानित दरात कांदा विक्री केंद्रे सुरू केली आहेत.

देशभरातील प्रत्येक घराला परवडणारा कांदा मिळावा हे सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे, सरकार कांद्याच्या किमतीबाबत दक्ष राहण्यासाठी आणि ग्राहकांना भाववाढीपासून वाचवण्यासाठी कांद्याच्या सुलभ उपलब्धतेसाठी सरकारी यंत्रणा सक्रिय आहेत. यंदा असलेला 4.7 एलएमटी कांद्याचा उपलब्ध बफर स्टॉक आणि मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले खरीप पेरणीचे क्षेत्रासह वर्धित किरकोळ आणि मोठ्या प्रमाणात विक्री धोरणे, यामुळे येत्या महिन्यांत कांद्याच्या किमती नियंत्रणात राहतील.

या उपक्रमाने सकारात्मक मूर्त परिणाम आता लगेचच दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदी मोहीम सुरू केल्यानंतर दि. 05.09.2024 आणि 13.09.2024 दरम्यान उतरलेले कांद्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

  • दिल्ली: 60 रूपयावरून किमती कमी होऊन दर 55 रूपये झाला.
  • मुंबई : 61 रूपयावरून किमती कमी होऊन दर 56 रूपये झाला.
  • चेन्नई: 65 रूपयावरून किमती कमी होऊन दर 58 रूपये झाला.

वाढत्या मागणीचा विचार करून आणि कांद्याच्या किमती आणखी कमी करण्यासाठी सरकारने प्रमाण आणि वितरण वाढवण्याचा निर्णय घेतला. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, केंद्रीय भंडार आणि SAFAL च्या आउटलेट्समध्ये किरकोळ विक्रीचा विस्तार करण्यासोबतच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीचे धोरणही अवलंबले जात आहेत. याआधीच दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कांद्याची घाऊक विक्री सुरू झाली आहे. आणि येत्या काही दिवसांत हैदराबाद, बंगलोर आणि कोलकाता आणि अखेरीस सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये कांदा विक्री सेवेचा विस्तार केला जाईल. घाऊक विक्री ही रस्ते वाहतूक तसेच रेल्वेचे जाळे या दोन्ही माध्यमातून होत आहे. या उपक्रमामुळे लॉजिस्टिक व्यवस्‍‍थेत कार्यक्षमता आणण्याबरोबरच, काढणीनंतरचे नुकसान देखील कमी होण्‍यास मदत करेल .

ग्राहक व्यवहार विभाग देखील पुरवठा-मागणी परिस्थिती आणि किमतीच्या कलांवर आधारित लक्ष्यित आणि स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारांशी जवळून काम करत आहे.

SL/ML/SL

14 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *