रशिया-युक्रेन संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम नाही

 रशिया-युक्रेन संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम नाही

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशिया-युक्रेन संकटाचा (Russia Ukraine Crisis) द्विपक्षीय व्यापाराच्या दृष्टीने भारतावर थेट परिणाम होणार नाही परंतु तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. बँक ऑफ बडोदाच्या (बीओबी) आर्थिक संशोधन अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचल्या आहेत. त्यामुळे रुपयाच्या स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे.

रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ला केला आहे (Russia Ukraine Crisis). त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन परिसरात विविध समस्या वाढणार आहेत. या कारवाईचा निषेध म्हणून पाश्चात्य देश रशियावर आर्थिक निर्बंध लादत आहेत. जगाच्या इतर भागांमध्ये आर्थिक परिणाम वस्तूंच्या किमती वाढणे, महागाईत वेगाने वाढ आणि वाढीवर नकारात्मक परिणाम याच्या स्वरूपात दिसू शकतात.

जर हे संकट वाढले आणि इराणप्रमाणे रशियाला वेस्टर्न पेमेंट्स अँड इन्स्टंट मेसेजिंग सिस्टीम (स्विफ्ट) मधून बाहेर काढण्यात आले तर, ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे गंभीर चलनवाढ होऊ शकते असे इन्वेस्कोने एका अहवालात म्हटले आहे.'(Russia Ukraine Crisis)

2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आणि रिझर्व्ह बँकेचे द्वि-मासिक चलनविषयक धोरण या दोन्ही गोष्टी या संकटापूर्वी सादर करण्यात आल्या आहेत आणि त्यात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम विचारात घेण्यात आलेला नाही. अहवालानुसार, अर्थसंकल्प आणि रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणामध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर रहाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही किंमत पातळी आगामी काळात आव्हानात्मक होऊ शकते.

अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात तेलाची आयात 155.5 अब्ज डॉलर असू शकते. आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा झाल्यामुळे पुढील आर्थिक वर्षातही तेलाच्या आयातीत सुधारणा अपेक्षित आहे. तेलाची मागणी 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

त्यात म्हटले आहे की तेलाच्या किमतींमध्ये कायमस्वरूपी 10 टक्के वाढ झाल्यास तेल आयातीत 15 अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या 0.4 टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढेल. तेलाच्या किमती वाढल्याने रुपयावरही परिणाम झाला आहे. यामुळे व्यापारी तूट वाढेल आणि शेवटी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आघाडीवर स्थैर्यावर परिणाम होईल.

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाल्याचा ग्राहक मुल्य निर्देशांक आधारित महागाईवर 0.15 टक्क्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होईल. तर घाऊक महागाईचे कच्च्या तेलाशी संबंधित उत्पादनांमध्ये वाटा 7.3 टक्के आहे. अशा परिस्थितीत 10 टक्क्यांची वाढ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे घाऊक महागाई दर सुमारे एक टक्क्याने वाढू शकते.

The Russia-Ukraine Crisis will not directly affect India in terms of bilateral trade, but rising oil prices could pose a threat to the economy. The Bank of Baroda’s (BOB) economic research report has expressed these fears.

PL/KA/PL/26 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *