आर्थिक आघाडीवर अनेक आव्हाने असतानाही रुपया चार टक्क्यांनी मजबूत

 आर्थिक आघाडीवर अनेक आव्हाने असतानाही रुपया चार टक्क्यांनी मजबूत

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया चार टक्क्यांहून अधिक बळकट झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, परकीय भांडवलाच्या प्रवाहातील सातत्य (Continuity in the flow of foreign capital) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विचारपूर्वक आणलेल्या धोरणांमुळे आर्थिक आघाडीवर अनेक आव्हाने असूनही भारतीय चलनासाठी (Indian currency) 2020-21 हे एक मजबूत वर्ष ठरले आहे.

2021-22 मध्ये रुपया 74 च्या पातळीवर राहू शकेल
In 2021-22, the rupee could remain at 74

2021-22 मध्ये रुपया सरासरी 73.50 ते 74 च्या पातळीवर राहू शकेल. यामागचे कारण म्हणजे लस आल्यानंतरही कोरोना विषाणूबद्दल (coronavirus) भीती कायम आहे आणि त्याचा परिणाम परकीय चलन बाजारावर पहायला मिळु शकतो.

अस्थिर वर्ष
Unstable year

रुपयासाठी 2020-21 हे आर्थिक वर्ष उतार चढावांचे होते. इक्विटी बाजारात साथीमुळे मोठ्या प्रमाणावर विक्रीमुळे रुपया एकेकाळी 76.90 वर गेला होता. मात्र लस येण्यामुळे अपेक्षा वाढल्याने, टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्यामुळे, सरकार आणि मध्यवर्ती बँकांद्वारे जगभरातील प्रोत्साहन उपायांमुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि रुपया 72 च्या पातळीवर आला.
या संदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे उप प्रमुख (किरकोळ संशोधन) देवर्ष वकील म्हणाले की अमेरिकेच्या तुलनेत जास्त व्याज आणि महागाई असतानाही 2020-21 मध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया चार टक्के बळकट झाला.

पहिल्या नऊ महिन्यांत थेट परकीय गुंतवणूक सर्वात जास्त
Foreign direct investment the highest in the first nine months

तज्ज्ञांच्या मते देशाच्या सूचीबद्ध समभागांमध्ये सातत्याने भांडवलाची वाढ झाल्यामुळे (Continuity in the flow of foreign capital) भारतीय चलनासाठी मजबूत वर्ष ठरले आहे. चालू आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 35.22 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. 2014-15 नंतरची ही सर्वाधिक आहे. 2020-21 च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारताने 67.54 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजचे ज्येष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर म्हणाले की रुपयात चढउतार आश्चर्यकारक नाही कारण रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरणाद्वारे आणि परकीय चलन बाजारामध्ये आवश्यक हस्तक्षेप करून रुपयाला आवश्यक आधार दिला आहे. या व्यतिरिक्त देशांतर्गत शेअर बाजारामध्ये सातत्याच्या भांडवली प्रवाहानेही रुपयाला आधार मिळाला.
The rupee has strengthened by more than four per cent against the US dollar so far this fiscal. According to experts, 2020-21 has been a strong year for the Indian currency despite many challenges on the economic front due to the continuity in the flow of foreign capital and the prudent policies of the Reserve Bank of India.
PL/KA/PL/30 MAR 2021
 

mmc

Related post