खा.रामदास आठवलेच्या विजयाच्या हॅट्रिकमुळे रिपाई कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकार मध्ये तिसऱ्यादा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांची निवड झाल्याने रिपाई कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचं वातावरण आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी 5 जुलै 2016 रोजी केंद्रीय प्रथमतः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.तेंव्हा देशभरात दलित बहुजन जनतेत आनंद उत्सव साजरा झाला होता.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा नेता पहिला भीमसैनिक म्हणून ना. रामदास आठवले यांना केंद्रीय राज्य मंत्री पदाचा बहुमान लाभला होता.त्यानंतर 2019 मध्ये केंद्रीयमंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा रामदास आठवले यांना संधी मिळाली होती.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकार मध्ये खा .रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात समावेश झाल्याने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खा.रामदास आठवले यांची मंत्रिमंडळात निवड झाल्याने मुंबई येथील पक्ष कार्यालयासमोर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरावर नृत्य करत फटाके फोडून, आतिषबाजी करण्यात आली . तसेच एकमेकांना पेढे भरवत रिपाई पदाधिकारी यांनी मोठा आनंद आणि जलोष साजरा केला. यावेळी रिपाई दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय पवार,सरचिटणीस शिरीष चिखलकर , कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, म्युनिसिपल कामगार नेते प्रकाश जाधव, विजय जाधव,दादासाहेब जाधव,आदी उपस्थित होते.
SW/ML/SL
11 June 2024