निवृत्ती पेन्शनधारक देणार आता ऑनलाईन हयात दाखला
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारक लोकांना , विशेषतः वयस्कर लोकांना आपल्या हयातीचा दाखला देण्यासाठी आता केन्द्र सरकारने विशेष ऍप तयार केलं असून त्याद्वारे आता घरबसल्या हा दाखला देत येणार आहे.या ऍप ची सुरुवात आज महाराष्ट्रात ठाण्याजवळ अंबरनाथ येथील स्टेट बँकेच्या शाखेत करण्यात आली.Retirement pensioners will now give online life certificate c
निवृत्ती वेतन धारकांना दरवर्षी आपण हयात असल्याचा दाखला प्रत्यक्ष बँकेत जाऊन द्यावा लागत असे, त्यासाठी दोन ते तीन तास खर्च होत असे , त्यामुळे हे करणं त्रासदायक होतं, वयस्कर लोकांना तर त्याचा मनस्ताप होत असे , अपंग अथवा अनेक व्याधींनी ग्रस्त लोकांना ते नकोसे वाटे. यावर उपाय म्हणून ही ऑनलाईन ॲप ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
वयस्कर लोकांना त्यांचे आधार कार्डाचे अंगठे देखील नीट प्रमाणित होणं शक्य होत नसे , मात्र आता ऍप मधून थेट चेहरा पाहून ते प्रमाणित होणं शक्य झालं आहे, याबाबत पेन्शनर खूष आहेत.
केंद्रीय पेन्शन विभागाचे अवर सचिव मनोज कुमार, सहायक कक्ष अधिकारी अकलेश मान यांच्यासह अन्य मान्यवरांनी अंबरनाथ येथील स्टेट बँकेच्या शाखेत याचे उद्घाटन केलं आणि लगेच पेन्शन धारकांना त्याचा लाभ देणं सुरू करण्यात आलं, याचा फायदा आता या शाखेतील दोन हजार पेन्शन धारकांना होणार आहे.
ML/KA/PGB
16 Nov .2022