RBI कडून रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर

 RBI कडून रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या एमपीसीची तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाऊआहे. दहा वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असून सत्ताधारी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालानंतर सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज या बैठकीच्या शेवटच्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्विमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्यात आल्याची माहिती दिली. म्हणजे सध्या रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम राहणार आहे. चालू आर्थिक वर्षातील पतधोरण समितीची ही दुसरी बैठक होती.

आरबीआयने रेपो दरात फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटचा बदल केला होता. म्हणजेच गेल्या 16 महिन्यांपासून रेपो दर स्थिर आहेत. रेपो दरांमधील बदलांचा थेट परिणाम कर्जदारांवर होत असतो. रेपो दर वाढवल्यास बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात. त्यामुळे कर्जदारांच्या हप्त्यात वाढ होते. म्हणजेच कर्ज महाग होतात. तसेच रेपो दर कमी केल्यास कर्ज देखील स्वस्त होतात.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 25 साठी विकास दराचा अंदाज 7 टक्क्यांवरून 7.2 टक्के केला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 7.2 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे. तर आधी तो 6.9 टक्के होता. तज्ज्ञांचा असा विश्वास होता की महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआय रेपो रेट जैसे थे ठेवेल. दरम्यान, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ कॅनडा यांनी आपापल्या प्रमुख धोरण दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.

SL/ML/SL

7 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *