लाकडी ओंडक्यापासून साकारल्या पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती

 लाकडी ओंडक्यापासून साकारल्या पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक दिवसापासून मुंबईतील उद्यानांची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती मात्र त्यानंतर महापालिकेने पालिकेची सर्व उद्याने अत्याधुनिक व सुशोभित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानात अनेक नवनवीन बदल केले जाऊ लागले आहेत. उद्यानात वाचनालय, मनोरंजन उद्याने अशा संकल्पना राबवत असताना आता नव्याने उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली येथील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात लाकडी घुबड, कोंबडा, ससा, अस्वल, मांजर आणि वेगवेगळे कार्टून्सच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. लहान मुलांनी मोबाइलमधून बाहेर पडून निसर्गात रमण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे.

सार्वजनिक उद्याने, मैदाने येथे आबालवृद्धांचा वावर वाढावा यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका उद्यान विभागामार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून २४ विभागात वाचनालय सुरू करण्याचा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत १५ विभागात २२ वाचनालय सुरू केले आहेत. तर, आता वाचनालयासह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ पशुपक्षी तयार केले आहेत. आर मध्य उद्यान विभागाने ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन पावसाळ्यात मुंबईत उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या लाकडाच्या ओंडक्यांचा वापर करून पालिकेचा एकही पैसा खर्च न करता नाममात्र साहित्याने, लहान मुलांचे नेहमीच आकर्षण असणारे कार्टून्स बनविण्यात आले आहेत.Replicas of animals and birds made from wooden eggs

आबालवृद्धांना मोबाइलच्या विश्वातून बाहेर काढण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी उद्यान विभाग  प्रयत्नशील आहे. त्याकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत. लोकसहभागातून वृक्ष संजीवनी अभियान, बालदिनाला मुलांच्या हस्ते वृक्षारोपण, आबालवृध्दांना नर्सरी प्रशिक्षण, उद्यानात मोफत वाचनालय असे अनेक कार्यक्रम उद्यान विभागामार्फत राबवले जातात, अशी माहिती उद्यान विभाग प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी दिली.

ML/KA/PGB
28 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *