सर्वोच्च न्यायालयाकडून ‘तांडव’ वेबसीरीजबाबत दिलासा
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओटीटी हा अभिव्यक्तीचा एक नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यापासून बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टपणे मांडणी करणारे बरेच चित्रपट आणि वेब सिरीज गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहेत. यापैकी काही कलाकृतींवर आक्षेपही घेतला जातो. काही वादाच्या भोवर्यारतून थेट न्यायालयात जातात. तर काही त्याच भोवर्यातून आऊटडेटेड होतात.Relief from Supreme Court regarding ‘Tandav’ webseries
अशीच एक ॲमेझॉन प्राईमवरील वादग्रस्त ठरलेली वेबसीरिज म्हणजे ‘तांडव’, याच वेबसीरिजच्या संदर्भात एका मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. ‘तांडव’ वेबसीरिजच्या प्रकरणात ॲमेझॉन प्राईमच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात हा निकाल दिला गेला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने पुरोहित तपासात सहकार्य करत असल्याचे लक्षात घेऊन दिलासा दिला.
मागच्या जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरातून या सीरिजला विरोध करण्यात आला. या वादग्रस्त वेबसीरिजविरूध्द पुरोहित यांच्यावर एफआयर दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी ५ मार्च २०२१ रोजी पुरोहित यांना अटक होण्यापासून संरक्षणही दिले होते.
खंडपीठातील न्यायमूर्तींच्या मते, केलेली विधान लक्षात घेता, आम्ही अंतरिम आदेशाची पुष्टी करतो आणि निर्देश देतो की याचिकाकर्ती अपर्णा पुरोहित यांना अटक झाल्यास, त्यांना अटक अधिकारी/ट्रायल कोर्टाने निश्चित केलेल्या अटी व शर्तींवर जामिनावर सोडले जाईल. असे नमूद केले आहे.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने २७ जानेवारी २०२१ रोजी वेबसीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.
ML/KA/PGB
12 Dec .2022