अनिल अंबानींच्या Reliance Infra ने जिंकला 780 कोटींचा खटला
मुंबई, दि. 30(एमएमसी न्यूज नेटवर्क) :
अनिल अंबानी गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्याची रिलायन्स पॉवर ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे. त्याचबरोबर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने तिचे कर्ज 3,831 कोटींवरून 475 कोटी रुपयांपर्यंत 87 टक्क्यांनी कमी केलंय. त्यात अजून एका दिलासादायक बातमीची भर पडली आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालस्थित दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबतच्या वादात रिलायन्स ग्रुप फर्मचा विजय झाला आहे.
रिलायन्स इन्फ्राने पश्चिम बंगालमधील पुरुलिया इथे 3,750 कोटी रुपयांमध्ये 1,200 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी करार केला होता. पण विवाद आणि इतर कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला, ज्यामुळे DVC ने रिलायन्स इन्फ्राकडून नुकसान भरपाई मागितली. अनिल अंबानी समूहाच्या फर्मने मात्र याला आव्हान दिलं आणि 2019 मध्ये लवाद न्यायाधिकरणाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आणि DVC ला कंपनीला 896 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. डीव्हीसीने लवाद न्यायाधिकरणाच्या आदेशाला कोलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिलं, आणि 2019 मध्ये लवाद न्यायाधिकरणाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आणि DVC ला कंपनीला 896 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. डीव्हीसीने लवाद न्यायाधिकरणाच्या आदेशाला कोलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिलं, जे न्यायालयाने फेटाळून लावल आहे.
कंपनीने म्हटलंय की न्यायालयाने लवादाचा निर्णय कायम ठेवला आहे. ‘पूर्व वाटप व्याज सवलत आणि बँक गॅरंटीवरील व्याजातील कपात वगळता, म्हणजे रु. 181 कोटी जमा झालेल्या व्याजासह एकूण रु. 780 कोटी आणि याशिवाय 600 कोटी रुपयांची बँक हमीही दिली जाणार आहे.
SL / ML / SL
30 Sept 2024