७५ हजारांची नोकरभरती एका वर्षात
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ७५ हजार पदांची सर्व नोकरभरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.
याबाबतची लक्षवेधी प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केली होती. शिक्षण विभागाची भरती प्रक्रिया फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून त्यातील नेमणुका मार्च २३ पर्यंत देण्यात येतील, एम पी एस सी मार्फत भरण्याची पदे वर्षभरात पूर्ण करण्यात येतील असंही केसरकर म्हणाले.
मुंबईतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली , याबाबतची लक्षवेधी अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती. या यंत्रणेसाठी चा निधी सरकारने मुंबई महापालिकेला उपलब्ध करून दिला गेला आहे असं केसरकर म्हणाले.
ML/KA/SL
29 Dec. 2022