उड्डाणास सज्ज वैमानिकाचा cardiac arrest ने मृत्यू

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कामाच्या अत्याधिक ताणामुळे अगदी तरुण वयात तंदुरस्त दिसणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू होण्याची संख्या सध्या वाढली आहे. विमानाचे उड्डाण करण्यासाठी सज्ज झालेल्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. वैमानिक नागपूरहुन पुण्याला इंडिगो (Indigo) कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, विमानात बोर्ड होण्यापूर्वीचं त्यांच्या मृत्यू झाला.
आज, सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम असे मृत्यू झालेल्या विमानाच्या पायलटचे नाव आहे. इंडिगो कंपनीचे विमान नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर विमान कंपनी इंडिगोने निवेदन जारी केले आहे. आज नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाचे निधन झाल्याने दुःख झाले आहे. नागपूर विमानतळावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे दुर्दैवी निधन झाले असल्याचे कंपनीने म्हटले.
दरम्यान, ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या रोस्टरनुसार, आज ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी विविध क्षेत्रात विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय, 27 तासांची विश्रांतीही घेतली. पायलटने काल, त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटेच्या (अंदाजे पहाटे 3 ते सकाळी 7 दरम्यान) सुमारास विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी 27 तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज 4 सेक्टरसाठी दुपारी 1 वाजता प्रस्थान केले. नागपूरहून प्रस्थान होते. त्यांचे हे विश्रातीनंतरचे पहिले सेक्टर होते, अशी माहिती ‘इंडिगो’च्यावतीने देण्यात आली आहे.
SL/KA/SL
17 Aug 2023