#भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केले 3 बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांचे परवाने

 #भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केले 3 बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांचे परवाने

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) परवाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर अन्य 6 एनबीएफसींनी त्यांचा परवाना आरबीआयच्या स्वाधीन केला आहे. यापूर्वीही आरबीआयने अनेक एनबीएफसींचा परवाना व्यवसाय न केल्यामुळे रद्द केला आहे. तसेच काही एनबीएफसींनी व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांचा परवाना स्वाधीन केला होता.
बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देशातील बँका आणि बाजारातून पैसे उधार घेऊन ग्रामीण आणि शहरी भागात छोटा व्यावसाय करणार्‍यांना कर्ज पुरवतात. एनबीएफसीचा व्याज दर बँकेपेक्षा थोडा जास्त असतो. परंतु एनबीएफसीकडून कर्ज घेण्यासाठी लोकांना जास्त कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात रहाणार्‍या लोकांना सहज कर्ज मिळते.
आरबीआयने 3 बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) परवाने रद्द केले. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार आरबीआय अधिनियम -1934 च्या कलम-45-I च्या कलम-ए च्या नियमांनुसार काम न केल्यामुळे या एनबीएफसींचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात उत्तर प्रदेशच्या अभिनव हिरे परचेस, गुरुग्रामची ज्युपिटर मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि आसामची एनई लिजिंग अँड फायनान्स यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त 6 एनबीएफसींनी त्यांचा परवाना स्वाधीन केला आहे. या कंपन्या देखील आरबीआय अधिनियम -1934 नुसार काम करु शकत नव्हत्या. यात नोएडाची रघुकुल ट्रेडिंग, वाराणसीची दिव्या टाय-अप, नवी दिल्लीची गिरनार इन्व्हेस्टमेंट, अंधेरी (मुंबई) चॉईस इंटरनॅशनल, जयपूरची देवयानी इन्फ्रास्ट्रक्चर अँड क्रेडिट आणि गुवाहाटीची जेके बिल्डर्स आणि प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांनी परवाना आरबीआयच्या स्वाधीन केला आहे.
तज्ञ म्हणतात की कोरोना साथ आणि टाळेबंदी यामुळे देशात आर्थिक घडामोडी थंडावल्याने एनबीएफसींना काम करण्यात अनेक अडचणी येत आहेत. खरे तर, बाजारात कर्जाची मागणी नसल्यामुळे एनबीएफसीचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून एकदमच थंडावला होता. यामुळे आरबीआयने 3 एनबीएफसींचा परवाना रद्द केला आणि 6 एनबीएफसींनी स्वत:चा आपला परवाना स्वाधीन केला.
Tag-RBI/Non-Banking Finance company/Liecence
PL/KA/PL/9 JAN 2021

mmc

Related post