#वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

 #वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे की त्यांनी महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार बँक आपल्या विद्यमान ठेवीदारांचे संपूर्ण पैसे परत करू शकणार नाही. म्हणूनच त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
केंद्रीय बँकेने सांगितले की सहकारी बँकेचा परवाना रद्द करणे आणि दिवाळखोरीची (लिक्विडेशन) प्रक्रीया सुरु झाल्याने वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल, रिझर्व्ह बँकेने सांगितले की लिक्विडेशननंतर ठेव विमा आणी कर्ज हमी महामंडळाकडून ठेवीदार पाच लाख रुपयांपर्यंतची ठेव मिळण्यास पात्र ठरणार आहेत. अशा प्रकारे, सहकारी बँकेच्या 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. सहकारी बँकेचा परवाना सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रद्द झाल्याचे मानले जाईल. त्यानंतर सहकारी बँक कारभार करू शकणार नाही.
Tag- RBI/Bank/Liecence/Cancelled
PL/KA/PL/13 JAN 2021

mmc

Related post