#2021 मध्ये बँका 56 दिवस बंद राहणार, भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

 #2021 मध्ये बँका 56 दिवस बंद राहणार, भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2020 वर्षे संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी 2021 मध्ये बँका किती दिवस बंद रहाणार आहेत ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासून घ्यावी. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार 2021 मध्ये बँका पूर्ण 56 दिवस बंद राहतील. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, बँका रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. काही सुट्ट्या देशभरातील बँकांना लागू करण्यात आल्या आहेत, तर काही विशिष्ट राज्यांसाठी आहेत.
जानेवारी 2021
>> 1 जानेवारी, शुक्रवार – नवीन वर्षाचा दिवस
>> 2 जानेवारी, शनिवार – नवीन वर्षाची सुट्टी
>> 9 जानेवारी, दुसरा शनिवार
>> 11 जानेवारी, सोमवार – मिशनरी दिन
>> 14 जानेवारी, गुरुवार – मकर संक्रांती आणि पोंगल
>> 15 जानेवारीला तिरुवल्लुवर दिनामुळे काही राज्यांमध्ये बँकांना सुट्या असतील
>> 23 जानेवारी, चौथा शनिवार
>> 26 जानेवारी, मंगळवार – प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी 2021
>> 13 फेब्रुवारी, दुसरा शनिवार
>> 16 फेब्रुवारी, मंगळवार – वसंत पंचमी
>> 27 फेब्रुवारी, चौथा शनिवार – गुरु रविदास जयंती
मार्च 2021
>> 11 मार्च, गुरुवार – महाशिवरात्री
>> 13 मार्च, दुसरा शनिवार
>> 27 मार्च, चौथा शनिवार
>> 29 मार्च, सोमवार – होळी
एप्रिल 2021
>> 2 एप्रिल, शुक्रवार – गुड फ्रायडे
>> 8 एप्रिल, गुरुवार – बुद्ध पौर्णिमा
>> 10 एप्रिल, दुसरा शनिवार
>> 14 एप्रिल, गुरुवार – बैसाखी आणि डॉ.बी.आर.आंबेडकर जयंती
>> 21 एप्रिल, बुधवार – राम नवमी
>> 24 एप्रिल, चौथा शनिवार
>> 25 एप्रिल, रविवार – महावीर जयंती
मे 2021
>> 1 मे, शनिवार
>> मे डे किंवा कामगार दिन
>> 8 मे, दुसरा शनिवार
>> 12 मे, बुधवार – ईद-उल-फितर
>> 22 मे, दुसरा शनिवार
जून 2021
>> 12 जून, दुसरा शनिवार
>> 26 जून, चौथा शनिवार
जुलै 2021
>> 10 जुलै, दुसरा शनिवार
>> 20 जुलै, मंगळवार – बकरी ईद / ईद अल-अदहा
>> 24 जुलै, चौथा शनिवार
ऑगस्ट 2021
>> 10 ऑगस्ट, मंगळवार – मोहरम
>> 14 ऑगस्ट, दुसरा शनिवार
>> 15 ऑगस्ट, रविवार – स्वातंत्र्य दिन
>> 22 ऑगस्ट, रविवार – रक्षाबंधन
>> 28 ऑगस्ट, चौथा शनिवार
>> 30 ऑगस्ट, सोमवार – जन्माष्टमी
सप्टेंबर 2021
>> 10 सप्टेंबर, शुक्रवार – गणेश चतुर्थी
>> 11 सप्टेंबर, शनिवार – दुसरा शनिवार
>> 25 सप्टेंबर, शनिवार – चौथा शनिवार
ऑक्टोबर 2021
>> 2 ऑक्टोबर, शनिवार – गांधी जयंती
>> 9 ऑक्टोबर, दुसरा शनिवार
>> 13 ऑक्टोबर, बुधवार – महा अष्टमी
>> 14 ऑक्टोबर, गुरुवार – महा नवमी
>> 15 ऑक्टोबर, शुक्रवार – दसरा
>> 18 ऑक्टोबर, सोमवार – ईद-ए-मिलान
>> 23 ऑक्टोबर, चौथा शनिवार
नोव्हेंबर 2021
>> 4 नोव्हेंबर, गुरुवार – दिवाळी
>> 6 नोव्हेंबर, शनिवार – भाऊबीज
>> 13 नोव्हेंबर – दुसरा शनिवार
>> 15 नोव्हेंबर, सोमवार – दीपावली सुट्टी
>> 19 नोव्हेंबर, शुक्रवार – गुरु नानक जयंती
>> 27 नोव्हेंबर – चौथा शनिवार
डिसेंबर 2021
>> 11 डिसेंबर – दुसरा शनिवार
>> 25 डिसेंबर – चौथा शनिवार आणि ख्रिसमस
Tag-RBI/2021/Bank Holidays/List
PL/KA/PL/29 DEC 2020

mmc

Related post