विठ्ठलाच्या मूर्तीस रंग लावून रंगपंचमी साजरी
![विठ्ठलाच्या मूर्तीस रंग लावून रंगपंचमी साजरी](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/03/Rangapanchami.jpg)
पंढरपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज रंगपंचमी निमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असतानाच सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीवर नैसर्गिक रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली.
यावेळेस पारंपारिक डफाची देखील पूजा करून डफ मिरवणूक झाली आणि रंगपंचमीची सांगता करण्यात आली. वसंतपंचमी ते रंगपंचमी असा एक महिनाभर विठ्ठलाची रंगपंचमी साजरी होत असते. या काळात विठ्ठलास दररोज पांढराशुभ्र पोशाख आणि त्यावर रंगाची उधळण होते. आजही केशरयुक्त रंगांची उधलन करून विठ्ठलाची रंगपंचमी साजरी करण्यात आली.
ML/KA/SL
12 March 2023