माधुरी दीक्षितच्या आईचे निधन

 माधुरी दीक्षितच्या आईचे निधन

मुंबई,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित (91) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी आपल्या मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला. स्नेहलता दीक्षित यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती श्रीराम नेने यांनी निवेदन जारी करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं, “आमची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या प्रियजणांच्या उपस्थितीत सकाळी निधन झालं.” आज सायंकाळी वरळीच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

माधुरीने तिच्या आईचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यान तिने आपल्या आईसाठी एक अतिशय प्रेमळ नोट शेअर केली होती. न पाहिलेले फोटो पोस्ट करत माधुरीने लिहिले- ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा. आई. असे म्हणतात की आई आणि मुलगी या चांगल्या मैत्रिणी असतात. यात शंका नाही. तू माझ्यासाठी जे काही केलेस, ती माझ्यासाठी मोठी देणगी आहे. मी तुझ्या चांगल्या आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना करते.’

SL/KA/SL
12 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *