रणधीर सावरकर भाजपाचे मुख्य प्रतोद….

अकोला, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय जनता पार्टीने विधानसभे
मधील मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली असून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे.
रणधीर सावरकर हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना शिवसेना ठाकरे गटाच्या गोपाल दातकर यांचा ५० हजार ६१३ मतांनी पराभव केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या पत्रानुसार विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी सावरकर यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
ML/ML/PGB 19 Dec 2024