रामदेव बाबांनी मागितली महिलांची माफी
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी ठाण्यात महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महिलांची माफी मागितली आहे.Ramdev Baba apologized to women
ठाण्यातील ढोकाळी इथे आयोजित एका योग शिबिरात बाबांनी महिलांनी कोणते कपडे घातल्यास त्या कशा दिसतात याबाबत वक्तव्य केले होते, त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता, राज्य महिला आयोगाने ही त्यांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते.
रामदेव बाबांनी महिला आयोगाला यावर उत्तर दिले असून आपण मातृ शक्तीचा नेहमीच सन्मान करतो , आपला संपूर्ण कार्यक्रम नारी सशक्तीकरण याबाबतच होता , आपल्या भाषणाचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे, मात्र तरीही आपण याबाबत खेद व्यक्त करतो आणि ज्यांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या असतील त्यांची क्षमा मागतो असे म्हटले आहे.
ML/KA/PGB
28 Nov .2022