राज ठाकरे यांना जामीन मंजूर , ५००रुपये दंड…
बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २००८ मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत अटक केली होती. या अटकेचे पडसाद परळीत उमटले होते. येथील धर्मापुरी पॉइंटवर कार्यकर्त्यांनी दगडफेकीत बसचे नुकसान केले होते. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर व चिथावणी दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.Raj Thackeray granted bail, Rs 500 fine…
याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते.
यामुळे ठाकरे हे परळी न्यायालयात आज हजर झाले .त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.कोरोनामुळे राज ठाकरे कोर्टात हजर राहू शकले नाही अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील अर्चित साखळकर यांनी माध्यमाना बोलतांना दिली.
दरम्यान राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कोर्ट परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
ML/KA/PGB
18 Jan. 2023