राहुल गांधीकडून घडली घोडचूक! छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजलीऐवजी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देताना मोठी चूक केली आहे. शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी एक्स पोस्टमधून शुभेच्छा देताना तसे म्हटले आहे. इतकी मोठी चूक झाल्याने विरोधक तसेच शिवप्रेमींकडून राहुल गांधींवर सडकून टीका होत आहे.
ML/ML/PGB 19 Feb 2025