राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकरांच्या बाबत वक्तव्याशी सहमत नाही

 राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकरांच्या बाबत वक्तव्याशी सहमत नाही

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांशी आपण सहमत नाही असे स्पष्ट करीत मात्र ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांनी याबाबत बोलू नये असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.Rahul Gandhi’s I do not agree with the statement about Savarkar

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काल या सावरकरांबद्दल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आणि आज रणजित सावरकर यांनी टीका केली होती.

आज ठाकरे यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट दे आदरांजली वाहिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते दिवाकर रावते, संजय राऊत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

आपल्याला लढता, लढता दहा वर्षे पूर्ण झाली.आज दहावा स्मृतिदिन आहे. महापौर बंगल्यात लवकरच स्मारक होईल असे ठाकरे यांनी सांगितले

यानिमित्ताने बाळासाहेबांच्या फटकारे व्यंगचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, शिवसेना प्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्षे लागली, बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण होईल, भाजप सगळीकडचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतो आहे,आपण तो द्यायचा की नाही हा देशातील जनतेचा निर्णय आहे असे ते म्हणाले.

ML/KA/PGB
17 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *