रब्बी हंगामातील पेरणी; सर्वाधिक पेरणी हरभरा; ज्वारीचं क्षेत्र घटले
बीड, दि 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यात ५४ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरणी झाली असून सर्वाधिक पेरणी हरभरा तर ज्वारीचं क्षेत्र घटले आहे.
यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतात पाणीसाठा मुबलक आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी ४२ हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरणी केली आहे. तर ६ हजार हेक्टरवर ज्वारी,३ हजार हेक्टरवर गहू आणि गेल्या वर्षी पासून राजमा पीक शेतकरी घेत आहेत यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने यावर्षी १ हजार हेक्टरवर राजमा पीक घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ML/KA/SL
1 Dec. 2022